इतरांच्या सुखात सुखा शोधा जीवन सुंदर होईल – मारोती बुद्रुक पाटील

इतरांच्या सुखात सुखा शोधा जीवन सुंदर होईल - मारोती बुद्रुक पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : आयुष्यात अडचणी नैराश्य संकटे आली तरी कधीच न डगमगता त्याही परिस्थितीत स्वतःला सावरून संकटावर मात करा व इतरांच्या सुखात सुख शोधण्याचा प्रयत्न करा असे आवाहन प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. सावरगाव (थोट) येथील युवा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हे जीवन सुंदर आहे या विषयावर प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक उद्धव मदरगावे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की इतिहासाला येण्याची आणि आपल्या जाण्याची नोंद ठेवावी वाटली की आपले जगणे व आपले जीवन सुंदर होईल आयुष्यामध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली त्याचीही यादी करा आणि तुम्ही किती लोकांना मदत केली त्याचीही यादी करा ज्यावेळी तुमच्या मदतीची याधी मोठी होईल त्यावेळी तुमचे जगणे सुंदर होईल अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करा तुमचं जीवन सुंदर आणि सफल होईल. संतांनी अनेक संकटे झेलत समाज प्रबोधनाचे कार्य सोडले नाही.बाबा आमटे अण्णा हजारे पोपटराव पवार या ध्येय वेड्या माणसांनी इतरांच्या आयुष्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचे जगणे सुंदर झाले. युवकांनी व्यसनाधीन न होता आपल्या गावाच्या आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करावे आई-वडिलांच्या चरणावर सर्वच तीर्थक्षेत्र असतात हेही लक्षात ठेवावे. इतरांच्या सुखात आणि दुःखात आपण सहभागी झालो की आपले जगणे सुंदर होते. असे बुद्रुक पाटील यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सार्वजनिक गणेश मंडळाचे महेश पाटील, नागनाथ कोरनुळे, रुपेश कोरनुळे, अध्यक्ष गणेश मनोरे,उपाध्यक्ष गोविंद कोरनुळे, सचिव नवनाथ शेळके, व सर्व सदस्यांनी सहकार्य केले. व्याख्यान संपल्यावर गावातल्या 25 मुलांनी आयुष्यभर कुठलेही व्यसन न करण्याची शपथ घेतली.

About The Author