छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : देशालाच नाही तर जगालाही शिवरायांच्या कार्याची प्रचिती मिळाली. जगात अनेक राजे होऊन गेले परंतु लोकशाही पध्दतीने राज्य करून रयतेच्या कल्याणासाठी आपले राजेपण पणाला लावणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होते. जिजाऊँनी शिवबावर चांगले संस्कार केल्यामुळे अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याचे काम शिवरायांनी केले. वयाच्या पंधराव्यावर्षी पहिल्यांदा तोरणा जिंकून 1645 ला त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. परंतु सध्याच्या पिढीने हातात भगवा घेऊन स्वार्थ साधण्याचे काम सुरू केलेले आहे. त्यामुळे तरूणाईने तशी वाटचाल न करता छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करून यशस्वी वाटचाल करावी. कारण छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा आहेत, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात बोलत होते. यगावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वय संभाजीराव पाटील, प्रा.सतीश यादव, समन्वयक विनोद जाधव, समन्वयक डी.एन.गोरे, प्राचार्य सच्चिदनंद जोशी, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य कचरे, प्राचार्य मोहन खुरदळे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य डॉ.आशा जोशी, मु.अ.संजय बिराजदार,मु.अ.अरूणा कांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले, समाजामध्ये कार्य करीत असताना समाजकारण असेल राजकारण असेल कोणत्याही क्षेत्रात चांगल काम करणार्यांचे कौतुक करा. मी परमेश्वरावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मी भगवान शंकराची व छत्रपती शिवरांयाची पुजा करतो. यांनी मानवाला घडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे शिवराय हे कोण्या एका जाती-धर्माचे नव्हते तर ते सर्वांना सोबत घेवून कार्य करणारे जाणते राजे होते. त्यांनी नैतिकता जपण्याचेही काम केले. म्हणूनच स्वराज्यासाठी हिरोजी फर्जंद,शिवा न्हावी, मदारी मेहतर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर यांच्यासारख्या अनेक शिलेदारांनी जिवाची बाजी लावून स्वराज्य निर्मितीसाठी योगदान दिले. छत्रपती शिवरायांनी मुत्सद्देगिरी व युध्दनितीचा अचुक वापर करून गनिमीकावा पध्दतीने वाटचाल करून शत्रुचा पराभव केला.व 1674 साली रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. वयाच्या बाराव्या वर्षी तुकारामांनी त्यांना छत्रपती पदीव प्रदान केली असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्वामी विवेकानंद इंट्रिगेशन इंग्लिश स्कूलच्यावतीने काढण्यात आलेल्या “ज्ञानार्जनाचा अविष्कार” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेच्या पदाधिकार्यासंह शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी यांची उपस्थित होती.
अडथळ्यावर मात करीत स्वराज्याची निर्मिती केली – माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील
छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेवून स्वराज्य उभारणीचे काम केले. या कामी त्यांच्या समवेत असणार्या मावळ्यांनी स्वराज्याकरीता जिवाची बाजी लावून शिवरायांना साथ देण्याचे काम केले. त्यामुळे मावळ्यांच्या साथीने अनेक अडथळ्यावर मात करीत शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. व गागाभट्टांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेकही केला. तेंव्हा ते क्षेत्रीय असल्याचे समोर आले. त्यामुळे शिवरायांच्या विचाराचा जागर आजही करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक प्रगतीवरही प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन नॅशनलन इंग्लिश स्कूल ही सी.बी.एस.ई.ची लातूर जिल्ह्यातील पहिली शाळा असून कोव्हीडच्या काळातही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून कोरोणाशी लढा देण्याचे काम केलेले आहे. यापुढील काळातही परिसर स्वच्छ ठेवून मास्कचा वापर करीत कोरोणावर मात करावी, असंही मत माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील यांनी शेवटी बोलताना व्यक्त केले.