‘टाईमलेस मॅनेजमेंट अँड टेक्निक्स’ चे उत्तम उदाहरण म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रा. विलास कोमवाड यांनी प्रकाश टाकताना असे प्रतिपादन केले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 18603 दिवसांच्या जीवन प्रवासात प्रत्येक प्रसंगी जाणता राजांच्या टाईमलेस मॅनेजमेंट अँड टेक्निक्स या धोरणाची प्रचिती येते. प्रत्येक मोहिमे मध्ये छत्रपती शिवाजीराजांचा असलेला प्रत्यक्ष सहभाग, गुप्तहेरांची भूमिका, गनिमी काव्याचा वापर, शत्रूविरुद्ध मनोवैज्ञानिक युद्ध तंत्राचा वापर, युद्धा मध्ये आपलं काही बरं-वाईट झालं तर पुढची सर्व योजना आखून युद्धावर जाणारं राजांचे नेतृत्व हे एक अद्भुत रसायन असल्याचे दिसून येते शत्रूलाही हेवा वाटावा अशा प्रकारचे राजांचे नेतृत्व होते. छत्रपती शिवाजीराजांमध्ये असलेली दूरदृष्टी, कामाची गती, कामामधील प्रामाणिकता, गुन्हेगारांना कडक आणि ताबडतोब शासन, स्त्रियांबद्दल असलेला आदर, आपल्या सहकार्याबद्दल असलेले प्रेम आणि सहानुभूती, या सर्वांमधून छत्रपती शिवाजीराजां मध्ये असलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची अनुभूती येते असे मत याप्रसंगी केले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ.रमेश पारवे, डॉ.प्रदीप सूर्यवंशी, डॉ.सुनील साळुंखे, डॉ.सुनिता सांगोले, डॉ. बालाजी घुट्टे, डॉ. नितीन डोके, प्रा.संजय कुलकर्णी, डॉ.प्रशांत दीक्षित, प्रा. शैलेश सूर्यवंशी कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव तसेच कार्यालयीन कर्मचारी रामकिशन शिंदे लखन सुरवसे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.