शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केला शिक्षकांचा सन्मान
उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, प्रमुख अतिथी म्हणून लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार हे उपस्थित होते
सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या यथोचित सत्कारानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हाताने बनवून आणलेल्या पर्यावरणपूरक पुष्पगुच्छाने सन्मान केला.हे पुष्पगुच्छ विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले.मृदुला शास्त्री हिने शिक्षकांचा सन्मान करणारे गीत गाईले.
अंबादास गायकवाड म्हणाले की, शिक्षक हे पिढी घडवणारे असतात.शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहोचले पाहिजे.त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला पाहिजे. या कार्यक्रमाचे संचलन,प्रास्ताविक,आभार नीता मोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता मोरे,आशा कल्पे, विनायक इंगळे,मुग्धा चापलवाड, ऋतुजा सुरवसे,मृदुला शास्त्री, दिव्या कांबळे, अपेक्षा केंद्रे यांनी प्रयत्न केले.
स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, केंद्रिय समिती सदस्य तथा कार्यवाह शंकरराव लासुने,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांनी शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.