जिल्ह्यात एक दिवसाचा कडक लॉकडाऊन

जिल्ह्यात एक दिवसाचा कडक लॉकडाऊन

जिल्हाधिकारी यांची माहिती

अमरावती (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा दिवसेंदिवस कोरोनाचा जोर वाढत असल्याने सबंध राज्यभर चिंतेच वातावरण पसरले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार की काय अशी चर्चा सुरू असतानाच अमरावती जिल्ह्यात एक दिवसाचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी एक दिवसासाठी संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. यातूनच अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात एक दिवसाचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. हा लॉकडाउन शनिवारी रात्री आठ वाजता सुरू होऊन तो सोमवार सकाळी सात वाजता संपेल अशी ही माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!