ना.धनंजयजी मुंडे साहेब हेच खरे निराधारांचे आधार:-गोपाळ आंधळे

ना.धनंजयजी मुंडे साहेब हेच खरे निराधारांचे आधार:-गोपाळ आंधळे

प्रभाग क्रमांक पाच मधील लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी पञाचे वाटप

परळी (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड चे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब हेच खर्याअर्थाने निराधारांचे आधार असल्याचे प्रतिपादन शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रभाग क्रमांक पाच मधील निराधार अनुदान प्राप्त लाभार्थ्यांना मंजुरी पञाचे वाटप कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक पाच मधील निराधार अनुदान प्राप्त लाभार्थ्यांना मंजुरी पञाचे वाटप शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे तालूका प्रमुख व्यंकटेश शिंदे, सं.गां.नि.यो.समिती चे सदस्य लाला खान पठाण, राष्ट्रवादी युवक आघाडी चे शहर सरचिटणीस बळीराम नागरगोजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते हनुमान आगरकर यांच्या उपस्थितीत आज गुरूवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
यावेळी बोलताना गोपाळ आंधळे म्हणाले की, ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्नांने बीड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे व न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने परळी मतदार संघात सर्वाधिक लाभार्थ्यांना हा फायदा मिळाला आहे. त्याबद्दल साहेबांचे आभार मानले. यावेळी व्यंकटेश शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार नेहमी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. तर लाला खान पठाण यांनी ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर या समिती ची जबाबदारी दिली. त्या संधीतून गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळावा या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आभार हनुमान आगरकर यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!