पोलिसांची देशी व गावठी दारु अड्यांवर धाड

पोलिसांची देशी व गावठी दारु अड्यांवर धाड

महागांव पोलिसांची करवाई; १ लाख २५ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महागांव (प्रतिनिधी) : पोलिसांनी फुलसावंगी शिवारातील पैनगंगा नदीच्या काठावर दोन मोहफुलाच्या गावठी दारुभट्टीवर रविवारी (दि.२१) धाड टाकली. शिवाय, संपूर्ण साहित्य नष्ट करण्यात आले. कारवाई दरम्यान आरोपी पसार झाले. फुलसावंगी परीसरातील पैनगंगा नदीच्या काठावर गावठी दारूभट्टी सुरु असल्याचे कळताच पोलिसांनी पाहणी केली. तिथे दारू काढली जात असल्याचे स्पष्ट होताच थाड टाकली. दरम्यान, पोलिसांना पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. या कारवाईमध्ये ४५ पिपे मोहफूल रसायन सडवा ६७५ लिटर व लिटर मोहफुलाची दारू व ते काढण्यासाठी लागणारे साहित्य असा एकुण ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुसरी धाड फुलसावंगी शिवारातील पैनगंगा नदीच्या काठावर मोहफुलाच्या गावठी दारुभट्टीवर करण्यात आली. या कारवाईमध्ये ३५ पिपे मोहफूल रसायन सडवा ५२५ लिटर व २० लिटर मोहफुलाची दारू व ते काढण्यासाठी लागणारे साहित्य असा एकुण ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसरी कार्यवाही महागांव येथिल इंदिरानगर येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये देशी दारुच्या ४५ बाटल्या असा १ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या तीन कारवाईमध्ये एकुण १ लाख २५ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई महागांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास चव्हाण, जमादार दिनेश आडे, गजानन राठोड, जयकुमार राठोड, पोलिस शिपाई संतोष जाधव यांच्या पथकाने केली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!