पोलिसांच्या कारवाईने अवैध दारू व गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

पोलिसांच्या कारवाईने अवैध दारू व गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

महागाव पोलिसांची चौथी कारवाई

महागाव (राम जाधव) : तालुक्यात नवीन आलेले ठाणेदार चव्हाण साहेब यांनी दिनांक २१ रोजी तालुक्यातील फुलसावंगी येथे दोन ठिकाणी व महागाव येथील इंदिरानगर येथे देशी व गावठी दारूभट्टीवर धाड टाकून कारवाई केली होती त्यात १लाख २५हजार ७७०रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर दिनांक २३ रोजी महागाव तालुक्यातील काळी टेंभी येथे महागाव पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्या जवळून गावठी दारू ५० लिटर दारू व ४०० लिटर मोहफुलाचा सडवा तसेच दारू काढण्यासाठी वापरलेले साहित्यासह पंचेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

काळी टेंभी येथील शेत शिवारात मोहफुल हातभट्टीवर गावठी दारू गाळण्याचे काम सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी त्यांच्या पथकासह धाड टाकून गावठी दारुसह आरोपींना अटक करण्यात आली असून तिन्ही आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. सदर धाड ही चौथी असून ठाणेदार विलास चव्हाण यांनी अवैध धंद्यावर धाडीचे सत्र सुरू केले असल्याने महागाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक समाधानी असल्याचे चित्र आहे. तर अवैध दारू विक्रेते व गावठी हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतल्याने अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेत स्वतः ठाणेदार विलास चव्हाण, पोलीस नाईक दिनेश आडे, संतोष जाधव, अतुल पवार, गजानन राठोड वाहन चालक शिपाई विवेक पराडकर यांनी पुढाकार घेतला आहे.

About The Author