गाडगेबाबा जयंतीनिमित्त भाजीपाला विक्रेते, गवंडी कामगार, ऑटोरिक्षा चालकांना चे मास्क वाटप
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : दि. २३ फेब्रुवारी रोजी गाडगेबाबा जयंतीनिमित्त सुपर स्प्रेडर ठरू पाहणाऱ्या भाजीपाला विक्रेते, गवंडी कामगार, ऑटोरिक्षा चालकांना डॉ. संतोष मुंडेंनी मास्क वाटप केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सावटाखाली संपूर्ण माहिती आहे. या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ शहर सुरक्षित रहावे यासाठी डॉ. संतोष मुंडेंनी आपल्या कृतीतून एक नवीन वस्तुपाठ घालून दिला आहे.
गेल्या वर्षभरात डॉ. संतोष मुंडे यांनी कोविडच्या गंभीर संकटात सातत्याने वैद्यकीय सेवा तर दिलीच आहे. शिवाय कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले आहेत. ज्यात फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायजर आदी गोष्टी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी मोफत वाटप मोहिमा या आधी राबविल्या आहेत.
आज कोरोनाची दुसरी लाट येण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एस एम एस अर्थात सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन अत्यावश्यक आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही “मी जबाबदार” मोहीम हाती घेतली आहे. त्याला एकप्रकारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी हजारो मास्क वाटून सकारात्मक प्रतिसाद देत एका जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत आहेत.