अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी अद्याप फरारच

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी अद्याप फरारच

आरोपीच्या अटकेसाठी महागाव पोलिसांना मुहूर्त सापडेना

महागाव (राम जाधव) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत बळजबरीने तिचे कपडे उतरवण्यास मजबुर करणारा आरोपी अद्याप मोकाटच असुन महागाव पोलिसांना त्याला अटक करण्यासाठी अजुन मुहूर्त सापडलाच नसल्याने सर्वत्र नाराजीचे सुर उमटत आहेत. महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे दिनांक१६फेब्रुवारी २०२१(मंगळवार) पिडीत मुलगी आपल्या वडील व बहिणीसोबत मक्त्याने केलेल्या शेतात शेळ्या गेली असता त्याच वेळी त्या शेतात गावातील उत्तम रतन राठोड(वय ५५)याला पीडितेच्या वडिलांनी शेतात चरत असलेल्या शेळ्यांकडे व मुलींकडे लक्ष ठेव मी गावात जावुन येतो म्हणुन सांगितले थोड्यावेळाने पीडितेची मोठी बहीण शेतात काम करण्यासाठी निघुन गेली असता आरोपी उत्तम राठोड याने याच संधीचा फायदा घेवुन आपल्या जवळ असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला लगतच्या नाल्यात नेवुन तिला मारहाण करून बळजबरीने तिचे कपडे काढण्यास सांगत होता यावेळी पिडीत अल्पवयीन मुलीने आरडाओरड केली असता शेजारच्या शेतातील मजुर महिलेने ही बाब पीडितेच्या वडीलांना सांगितली त्यावेळी तिच्या वडिलांनी नाल्याकडे पळत जावुन पहिले तर आरोपी आपल्या अल्पवयीन मुलीबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसुन आले तेव्हा तिच्या वडिलांनी आरोपीला तु असा का करीत होता याबद्दल विचारणा केली असता आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून पळ काढला.यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनाही पीडित मुलीसह महागाव पोलीस स्टेशन गाठून घटनेची फिर्याद दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महागाव पोलिसांनी तत्काळ आरोपी उत्तम राठोड विरूद्ध भादंवि १८६०-३५४(अ),३५४(ब),३२३,३५४बालकांचे लैंगिक अपराधा पासुन संरक्ष अधिनियम२०१२-८,१२नुसार गुन्हा दाखल केला परंतु जवळपास १२ते १३दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपीला अजुन पर्यंत अटक करण्यात आली नसुन पोलिसांना आरोपीच्या अटकेसाठी अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने महागाव पोलीस अल्पवयीन बालकांवर झालेल्या अत्याचारा बद्दल किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होत आहे. अवैध धंदे चालकांकडून न चुकता वसुली केली जात असतांना मात्र या गंभीर गुन्ह्यातील आरोपी ला अजुन अटक झाली नसल्याने महागाव पोलिसांप्रति नागरिकांमधून तीव्र नाराजीचे सुर उमटत आहेत.

About The Author