शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड यांच्या साथीने पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणार – जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड यांच्या साथीने पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणार - जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सन्मानदिन ही साजरा

निलंगा (प्रतिनिधी) : संपूर्ण देशामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतील गद्दारीमुळे पायउतार व्हावे लागले त्यांच्याच नेतृत्वाखाली व संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व विविध संघटनेच्या साथीने महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणारच असे आज निलंगा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित शिवसेना संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी ठणकावून सांगितले.

निलंगा येथील शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्याने जुळलेल्या राजकीय समीकरणाला साद घालत शिवसेना व संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यकर्ता सन्मानदिन म्हणून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले शिवसेनेचे खच्चीकरण करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकटे पाडणे व महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी अडचणीचे ठरणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणे या उद्देशाने शिवसेनेला अडचणीत आणण्याचे महापाप भाजपाच्या वतीने केले जात आहे त्याला भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारून अमाप माया जमवलेले गद्दार आमदार मंत्री त्यांचे आमिषाला बळी पडले यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाली परंतु एकही शिवसैनिक उद्धव साहेबांना गेला नाही व जाणार सुद्धा नाही यातच अनेकांनी शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचा जो निर्णय घेतला त्यात संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ सुषमाताई अंधारे या सर्वांचे लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करीत राजकारणाच्या या नव्या समीकरणाच्या साथीने महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणार असे ठणकावून माने यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य तालुका प्रमुख अविनाश रेशमे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील हरिभाऊ सगरे अण्णासाहेब मिरगाळे युवा सेनेचे प्रशांत वांजरवाडे, उपशहर प्रमुख माधव नाईकवाडे, संभाजी ब्रिगेड चे तालुका सचिव इर्शाद आलम शेख, कुणाल पाटील, भरत चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे तालुकसंघटक अमोल माने, प्रसाद मठपती, किशनराव मोरे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मुस्तफा शेख, लायक शेख, शाखाप्रमुख राहुल बिराजदार ॲड. पद्माकर पेटकर, सुमित पाटील, प्रशांत जाधव, मोहसीन पटेल, बिबीशन चव्हाण, अन्वर पांढरे, झटिंग बिरादार, संजू बिरादार, मेहराज शेख, लक्ष्मण बिरादार, सोहेल नाईकवाडे, पांढरे शिवाजी, अमोल कोळकर, जाधव विशाल, महेश स्वामी, कृष्णा बिरादार, हाज्जू नाईकवाडे, समीर शेख इत्यादि पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!