पोलिस निरिक्षक संजीवन मिरकले यांच्या हस्ते कै.गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री ची आरती
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील प्रकाशनगरचा राजा गणपती कै.गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना 2006 ला करण्यात आली असून हे मंडळाचे 17 वे वर्ष आहे. दि. 6 सप्टेंबर रोजी श्री ची आरती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजीवन मिरकले यांच्या हस्ते श्री ची आरती संपन्न झाली. यावेळी प्रा.मस्के सर आणि पोलिस उपनिरिक्षक मुंढे यांचा सुरेश यादव व अनंतराव बाजुळगे यांनी शाल वटवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र पोलिस योगेश साहेब गणेश मंडळाचे संस्थापक चंद्रकांत साळुंके, अध्यक्ष बिभीषण सांगवीकर, उपाध्यक्ष सुरेश यादव, रामदास सारगे, मोहनराव भालके, शिवा बदनाळे, राजू सुतार, शशिकांत साळुंके, बस्वराज रेकुळगे, धनंजय मुळे, मनोज येदले, राजेंद्र सराफ, गणेश इंगळे, दिलीप कुलकर्णी, बप्पा माळी, शुभम चिंतलचेरे मोहसिन शेख सह अनेक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
