स्वच्छता सेविकांचा गौरी गणपती निमित्ताने साडी देऊन गौरव
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील न्यू शॉपिंग सेंटर भागातील विघ्नहर्ता सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक भान ठेवत नगर परिषदेतील स्वच्छता सेविकांचा गौरी गणपती सना निमित साडी व इतर वस्तू भेट देऊनं त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आला. शहरातील स्वच्छता सेविका या च खऱ्या लक्ष्मी असून सेविकांचा अथक प्रयत्ना मूळे शहराला मागील काळात स्वच्छता पुरस्कार सुद्धा मिळाला असून येणाऱ्या काळात देखील त्यांना प्रोत्साहन मिळावे या साठी अश्या कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाटक वैशालीताई चामे यांनी केले. सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या धनश्री पाटील या होत तर अध्यक्ष म्हणून श्रीमती अनिता ढाकणे, शीतल मालू, अक्षता कोणाले, मनीषा ठोंबरे या होत, सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऍड प्रितम भुतडा, अध्यक्ष आशिष ठोंबरे, निलेश माने, गजानन चांदेवाड, कौस्तुभ गादेवर, शुभम शेळके, निलेश माने, संदीप कोणाले, बाळू गिरी, प्रज्योत ढाकणे, प्रथमेश मालू, यांच्या सह अनेक पदाधिकारी यांनी प्रयत्न केले
