कोराळी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत मंमाळे तर उपाध्यक्ष नागनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड
कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : कोराळी येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून चंद्रकांत मंमाळे तर उपाध्यक्ष म्हणून नागनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आले. ही निवड ग्रामपंचायत येथे ग्रामसभा घेऊन सभेचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक सरपंच विक्रम कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले. चंद्रकांत मंमाळे हे सामाजिक कार्यकर्ते असून सर्वसामान्यासी त्यांची नाळ जुळलेले असल्याने गावातील सर्व नागरिकांतून बिनविरोध महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून निवड करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व सर्व गावातील नागरिकांच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी गावचे सरपंच विक्रम कारभारी उपसरपंच संजय मंमाळे ग्रामसेवक कदम साहेब चंद्रशेखर पाटील रवी कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बुकले सतीष रायजी नारायण गायकवाड केरबा हजारे अमर कारभारी तुळशीराम मंमाळे नागनाथ मंमाळे चंद्रार आकडे ताजुद्दीन मुजावर व्यंकट पाटील श्याम मंमाळे कबीर रायची महेश मंमाळे बालाजी आकडे शिवराज पाटील अन्य मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष चंद्रकांत मंमाळे यांच्यावर मित्र मंडळीकडून व अन्य मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
