वृक्षारोपण शाश्वत विकासाचा पाया ठरेल बाळासाहेब पाटोदे
छत्रपती शिवाजी महाराज युवक गणेश मंडळ उदगीर च्या वतीने गुरधाळ मध्ये वृक्ष लागवड
उदगीर (एल.पी.उगीले) : वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढीच्या रक्षणासाठी आणि शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे त्यासाठी सर्वांनीच मिळेल त्या जागी वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संवर्धन कसे करता येईल या दृष्टीने विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन युवा नेते भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी केले.
ते छत्रपती शिवाजी महाराज युवक गणेश मंडळ उदगीर च्या वतीने गुरधाळ मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या उपक्रमासाठी शहरातील इतरही मान्यवर मंडळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी प्रवीणजी मेंगशेट्टी,तहसीलदार रामेश्वर जी गोरे ,मंडळ अधिकारी गणेश हिवरे , मनोज पुदाले , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे ,छावां चे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील ,सतीश पाटील ,अंकुश ताटपल्ले ,पंकज कालानी , टायगर सेनेचे प्रमुख जकी दादा सावंत , अजय दादा सावंत ,सरपंच वैजनाथ झुंकलवाड , बाबासाहेब पाटील , पांडुरंग पाटील खुशाल पाटील विकास बिरादार, प्रा दशरथ गायकवाड , सखाराम पाटील वाडीकर , जाधव , कबनुस्कर, प्रा दशरथ गायकवाड , गणेश मोरतलें ,ग्राम पंचायत सदस्य जितेंद्र कांबळे ,नंदकुमार पटणे उपसरपंच ,सूर्यकांत नागठाणे प्रसाद स्वामी, विनोद बेंबडे , राजकुमार पाटील, मधुकर बिरादार व मोठ्या संख्येने गावकरी मंडळ उपस्थित होती. यावेळी प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे संयोजनसमितीच्या वतीने सतीश पाटील यांनी आभार मानले.
