केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विविध गटातून श्री भोगेश्वर विद्यालयास प्रथम आणि तृतीय पुरस्कार
देवनी (एल.पी. उगीले) : जि.प.केंद्रिय प्रा. शाळा तळेगाव (भो.) यांच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन उच्च प्राथमिक, उच्च माध्यमिक व शिक्षक अश्या तीन गटातून भरवण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो. तालुका देवणी येथील दहावी ( सेमी इंग्रजी ) वर्गात शिकत असलेल्या कु. लद्दे महादेवी धनाजी व कु बिरादार प्रज्ञा लक्ष्मण या विद्यार्थ्यीनींचा ” अपारंपरिक ऊर्जेचा ( सौर व पवन ऊर्जा ) वापर काळाची गरज” या प्रयोगाने तळेगाव भो. केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कु. गायकवाड जीजा तानाजी व जाधव नुतन दयानंद ( सेमी इंग्रजी ) याचा “घरगुती साहित्यतून प्रोजेक्टर निर्मिती” हा प्रयोग तृतीय आला. सदर विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक श्रीमती उज्वला कणजे व सुनील क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले . सदर यशस्वी विद्यार्थी आणि विज्ञान विषय शिक्षकांचे लोकजागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटरावजी पाटील, उपाध्यक्ष अण्णारावजी पाटील, सचिव भवानरावजी पाटील तळेगावकर (दादासाहेब), मुख्याध्यापक सुनील क्षीरसागर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
