एम आय एम, राष्ट्रीय दलित अधिकार मंच, अखिल भारतीय दलित पॅंथर आणि समविचारी पक्ष एकत्र
उदगीर (एल पी उगिले) : येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एमआयएमचे सर्वेसर्वा बॅरिस्टर असुसोद्दिन ओवेसी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवरील नेत्यांनी समविचारी पक्षासोबत मिळून निवडणुका लढवाव्यात, आणि जिंकाव्यात! अशा पद्धतीचा संदेश दिल्यानंतर उदगीर शहरातील सर्व समविचारी पक्षाचे कार्यकर्ते ज्यामध्ये प्राधान्याने राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मेहमूद अली साब यांच्या सल्ल्यानुसार एमआयएमचे शहराध्यक्ष शब्बीर मिंयाॅ यांच्या उपस्थितीत उदगीर नगर परिषदेच्या आणि इतरही निवडणुकांच्या संदर्भात बैठक घेण्यात आली.
सलग तीन वेळा उदगीर नगर परिषदेचे नियोजन व विकास सभापती राहिलेले निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले .
समविचारी पक्ष मिळून जर लढलो तर आपलाच विजय होईल. अशी खात्रीही दिली.
याप्रसंगी एमआयएमचे कार्याध्यक्ष शेख मुसा पठाण, उपाध्यक्ष जलील बागवान, सोशल मीडियाचे शहराध्यक्ष व शहर सचिव मुल्ला महबूब, मुकरम जागीरदार! एमआयएमचे नेता माजी नगरसेवक साबेर पटेल, शेख मुसा, सय्यद वासिम, अहमद खान , शहर प्रवक्ता मौलाना अजीज पटेल, अरफत हाश्मी,अझर हाशमी, बबलू पठाण, दायमी इरफान, शेख
माजीद, वाजिद हाश्मी, माजी नगरसेवक फकीर हाश्मी, अजहर हाश्मी, छोटू हाशमी, इरफान हाशमी,ऊबैद जरगर, सलमान दायमी,फाहिम सातभाई , आरफत सिद्दिकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी या बैठकीमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून तीन उमेदवार जनतेतून नगराध्यक्ष निवडून येणार असल्याने निश्चित करण्यात आले. यामध्ये प्राधान्याने यदाकदाचित नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जर खुल्या गटासाठी सुटले तर डॉक्टर शाहेद शेख, यांना संधी दिली जावी, आणि यदाकदाचित अध्यक्ष पदाचे आरक्षण जर मागासवर्गीय प्रवर्गासाठी निश्चित झाले तर राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांना संधी द्यावी. तसेच इतर मागास प्रवर्गासाठी जर संधी मिळाली तर साबेर पटेल यांची उमेदवारी निश्चित करावी. अशाही पद्धतीची चर्चा सदरील बैठकीत झाली. असे असले तरीही अंतिम निर्णय हा बॅरिस्टर आसुसोदिन ओवैसी हेच घेणार असल्याचेही सांगण्यात आले.
एकंदरीत भारतीय संविधानाच्या विचाराला धरून चालणाऱ्या सर्वधर्मसमभाव ही विचारधारा समाजात रुजावी. आणि समाजात भाईचारा टिकून राहावा. यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. असाही संदेश बॅ. ओवैसी यांनी दिला असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्या आधीच एम आय एम ने सर्व तयारी केली आहे. गेल्या वेळेस एम आय एम चा निसटता पराभव झाला होता, याची जाणीव ठेवून गेल्या वेळेस झालेल्या चुका सुधारून नव्याने सर्व ताकतीनिशी निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्धार एमआयएम पक्षाने घेतला असल्याची माहिती प्रकक्त्याच्या वतीने सांगण्यात आले.
एक मात्र नक्की की,एम आय एम ने कंबर खचून निवडणुक लढवण्याची तयारी केल्याने बरीच राजकिय समिकरणे बदलतील अशी चर्चा राजकिय वर्तूळात चालू आहे.
