कला ही व्यक्तीला अजरामर करते. – आ. संजय बनसोडे
‘मी रोहित’ भव्य जिल्हास्तरिय वक्तृत्व स्पर्धा,उद्घाटन पारितोषिक वितरण सोहळा
जळकोट (प्रतिनिधी) : सोमवार ता. पाच रोजी माध्यमिक शिक्षण विभाग लातूर व महात्मा फुले पब्लिक स्कूल जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. रोहित कळसे यांच्या स्मरणार्थ मी रोहित भव्य जिल्हास्तरिय वक्तृत्व स्पर्धा, उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते महात्मा फुल शैक्षणीक संकुल येथे संपन्न झाला .
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना संजय बनसोडे असे म्हणाले की , कला ही व्यक्तीला अजरामर करते. तसेच स्पर्धा ही प्रयत्नशील माणसाला नेहमीच यशाच्या शिखरावर नेऊन बसवते. त्यामुळे माणूस मोठा होतो. रोहित कळसे हा आज आणि उद्या आपल्या स्मरणात राहणार आहे. तो त्यांच्यातील असलेल्या अंगभूत कलेमुळे. तो अष्टपैलू विद्यार्थी म्हणून नेहमीच आदर्श राहिल. लहान वयात एवढी मोठी किर्ती खूप कमी व्यक्तींना लाभते. त्यापैकी रोहित हा एक होता. त्याच्या जयंती निमित्त आज होऊ घातलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तो माहीर होता. त्याच्या पालकांनी रोहित ज्या क्षेत्रात अग्रेसर होता , त्या प्रत्येक क्षेत्रात त्याच्या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा ठेवावी. आज होऊ घातलेले हे पहिले पुष्प अविरत चालू ठेवावे असे आवाहन केले.
यावेळी मंचावरून तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी यांनी विद्यार्थी नेहमीच शिक्षकांच्या आवडीचा असतो. रोहित हा तर सर्वांच्या आवडीचा होता. त्याच्या कला ह्या भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे यांनी लोहार व्यवसाय करीत शिक्षणाच्या माध्यमातून एका चांगल्या दिशेने कुटुंबाला नेण्याचे काम रोहितचे पंजोबा धोंडिराम कळसे यांनी केले. त्यामुळे रोहित कुटुंब एका चांगल्या दिशेने वाटचाल करीत आहे , याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण रोहित अल्पावधीतच गेला हे दुःख कधीही न विसरण्यासारखे आहे. असे प्रतिपादन केले.
जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जवळपास निलंगा, लातूर, चाकूर, उदगीर, अहमदपूर, कंधार, मुखेड अशा तालुक्यातून विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत माध्यमिक गटातून लातूररोडची विद्यार्थिनी प्रथम , जानवळ येथील द्वितीय आणि उदगीर येथील तृतीय क्रमांक मिळवला.
प्राथमिक गटात प्रथम शेंडगे अथर्व ,उदगीर येथील द्वितीय आणि तृतीय वाढवणा येथील विद्यार्थ्यांनी घेतला. सर्वांना रोख रक्कम , सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र आणि शामची आई ही कादंबरी भेट ह.भ.प. प्रबोधन महाराज पाळेकर, माजी जि प सदस्य चंदन पाटील, यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमास मा. जि प. सदस्य चंदन पाटील , तहसिलदार सुरेखा स्वामी , गटविकास अधिकारी नरेंद्र मेंढेवार, प्रभावतीताई कांबळे नगराध्यक्ष नगरपंचायत , मन्मथअप्पा किडे उपनगराध्यक्ष नगरपंचायत जळकोट, राष्ट्रवादी ता. अध्यक्ष अर्जुन आगलावे, मारोती पांडे , गटशिक्षणाधिकारी बबन ढोकाडे, माजी गट शिक्षणाधिकारी जी .डी कळसे, विठ्ठल चव्हान , नगरसेवक अॅड. तात्या पाटील, गोपालकृष्ण गबाळे, नागनाथ धुळशेटे, संजय देशमुख, विवेकानंद देवशेट्टे, गोविंद भ्रमन्ना , संदीप डांगे, महेश धुळशेट्टे, विनायक डांगे, किरण पवार ह . भ. प . प्रबोधन महाराज पाळेकर , प्राचार्य डी डी हांपल्ले, प्राचार्य संजय नागरगोजे, प्राचार्य चंद्रकांत बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . एम जे वाघमारे यांनी केले.
