केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात राजे संभाजी माध्यमिक विद्यालयाचा प्रथम क्रमांक
वाढवणा (बु) ता.उदगीर जि.लातूर. दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी वाढवना(बू) केद्रा तील जी. प.कन्या प्र.शाल. येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यामध्ये सर्व केंद्रातील शाळांनी सहभाग नोंदवला. या मध्ये राजे संभाजी विद्यालय ,वाढवणा (बू.) या विद्यालयाने सूर्यमाला प्रयोग सादर केला. सदरील प्रयोगास प्रथम क्रमांक मिळाला. या प्रयोगामध्ये वर्ग ८वी हेमनर शिवाजी तानाजी व मुंडकर ओमप्रकाश यांनी भाग घेतला. प्रथम क्रमांकाचे केंद्रात बक्षीस वितरण प्राचार्य, श्री जाधव पी. एस. यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रयोगास प्रा.खान एस एम व श्री .सरदार एम.बी आदींनी मार्गदर्शन केले प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थेच,सचिव,चंदन पाटील साहेब व सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मु अ श्री आमगे एस यु,, कांबळे एन एस व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
