हस्ताक्षर सुधार पुस्तिकेचे वाटप

हस्ताक्षर सुधार पुस्तिकेचे वाटप

उदगीर (प्रतिनिधी) : मौजे मांजरी येथील शिक्षण प्रेमी सरपंच नरसिंग शिंदे यांनी आणि उपसरपंच सचिनजी पाटील यांनी सरपंच निधीतून हस्ताक्षर सुधार व अंक लेखनाची संच आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांची गुणवत्ता वाढावी, हस्ताक्षरात व लेखनात सुधारणा होऊन यश संपादन करावेत, याच उद्देशाने ज्ञानज्योती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तिका संचाचे विद्यार्थ्यांना निशुल्क वाटप करण्यात आले,
विद्यार्थ्यांनी आभ्यास कसा करावा, एकाग्रता कशी वाढवावी, आत्मविश्वास कसा संपादन करावा? ह्याचे संपूर्ण मार्गदर्शन प्रा. शरद राठोड ह्यांनी केले. यावेळी उपस्थित गावचे सरपंच नरसिंग , उपसरपंच सचिन पाटील , मुख्याध्यापक अंबुलगे एस. एच व सहशिक्षक तळेगावकर पी. जी. ग्रामसेवक घंटेवाड , आंगणवाडी सेविका श्रीमती शिंदे के. एम. ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या संचाचे वाटप करण्यात आले. सरपंच उपसरपंच यांनी मुलांना ज्ञानज्योती चे संच वाटप केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

error: Content is protected !!