अक्का फाऊंडेशनचे राणी अंकुलगा येथे ३५वे नेत्रतपासणी शिबीर संपन्न
निलंगा (एल.पी.उगीले) : अक्का फाऊंडेशन’च्या ‘दृष्टी अभियाना’चे ३५वे शिबिर शिरूरअनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात एकूण १९० नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. अक्का फाऊंडेशन आयोजित या मोफत नेत्रतपासणी शिबीरांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी १९० नागरिकांच्या नेत्रतपासणीत १५ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. यापैकी अत्यावश्यक ०४ रुग्णांना तात्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
यावेळी गोंविदजी पिटले, गणपतीजी शेंडगे, नामदेवजी गुणाले, ओमप्रकाशजी देशमुख, धनराजजी देशमुख, विशालजी हराळे, उमाकांतजी जवळगे, शिवसंतोषजी देशमुख, संदीपजी मल्लेशे, विनायकजी लवटे, बालाजी गुराले जी, ॠषिकेशजी मल्लेशे, विकासजी जागले, माधवजी टोपे, गंगाधरजी शेंडगे, संकेतजी मल्लेशे यांच्यासह राणी अंकुलगा ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
