कु.कांचनताई शेळके यांचे कीर्तन भव्य दिव्य स्वरूपात संपन्न
गंगनबीड (अंकुश वाडीकर) : सीमाभागातील कमालनगर तालुक्यामध्ये दापका सर्कलमधील गंगनबीड ता. कमालनगर जि. बिदर या गावांमध्ये बाल गणेश मंडळ तर्फे गंगनबीड मध्ये तब्बल 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. रौप्य महोत्सव वर्ष म्हणून कु कांचनताई शिवानंद शेळके यांचे किर्तन ठेवण्यात आले होते. उत्कृष्टपणे कीर्तनकार आपली भूमि भूमिका बजावलेली आहे.
हरीनामाच्या गर्जनामध्ये जनसमुदाय तल्लीन झाला होता. महिला कीर्तन करू शकत नाहीत असा खोटा प्रचार असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले. महिला निर्मिक आहे, पुरुषाला घडवण्यात मोठा हात हा स्त्रियांचा असतो. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, छत्रपती संभाजी राजे तसेच संत मीराबाई, संत जनाबाई सारख्या संतांनी, विविध महिलांनी अनेक पुरुषांना घडवण्याचे काम केले. आपल्या कीर्तन सेवेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचं काम केले.
सध्या स्थिती महिला, “बेटी पढाव, बेटी बचाव” महिलांची भूमिका स्पष्टीकरण दृष्टांत देऊन सांगितले. वेगवेगळ्या दृष्टांत देऊन आपल्या कीर्तनटून सर्व भक्तांना नामाच्या गजरामध्ये तल्लीन करण्याचा काम कीर्तनकार कांचनताई यांनी केले आहे.
हल्लीच्या गतिमान युगामध्ये स्त्री पुरुष समानता असावी, हे रुजवण्याचं काम सर्व आई वडील, समाज बांधवांनी केलं पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याची मूल्य सुद्धा साध्या आणि सोपी भाषेत सांगण्याचे काम केले आहे. क्षणाक्षणाला मनुष्यांचे विचार बदलतात. यावर त्यांनी मार्मिक दृष्टांत, उदाहरण देऊन सांगितले आहे.
किर्तन सेवेतून नवयुवक, बालकांना देशभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा मूल्यांचे रुजवण्याचं काम या कीर्तनातून करण्यात आले आहे. किर्तन सेवा ऐकण्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात श्रोते, महिला, पुरुष हजारांच्या संख्यत आले होते.
बाल गणेश मंडळाचे कार्यकर्ते गणेश बिरादार, धनराज वाडीकर, विकास बिरादार, आप्पाराव वाडीकर, शाम वाडीकर, बालाजी मेहेत्रे, अमोल वाडीकर, किशन वाडीकर मोठ्या प्रमाणात बालगणेश चे कार्यकर्ते सज्ज राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम नवयुकांनी केलेला आहे. यांचा आदर्श परिसरातील नवयुकांनी घ्यावे.
