साने गुरुजी विद्यालायत एक दिवसीय केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
उदगीर : येथील साने गुरुजी विद्यालयात 2021 – 22 चे एक दिवसीय केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शन खूप उत्स्फूर्तपणे पार पडले. सकाळी उदगीर शहराच्या कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख प्रतिभाताई मुळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
परीक्षक म्हणून श्यामलाल हायस्कूल उदगीरचे राहूल लिमये, लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथील पडलवार बी. एल. आणि संग्राम शाळेचे तवंडे एस. एस.यांनी काम पाहिले.प्रदर्शनासाठी अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता.
सायंकाळी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष राम जाधव, प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजय शिंदाळकर,केंद्र प्रमुख प्रतिभाताई मुळे,दायमी,मुख्याध्यापक सुशांत कोंडेकर, मुख्यध्यापिका सुरेखा पटवारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यात दोन गट करण्यात आले होते, प्राथमिक गटात इयत्ता 6वी ते 8 वी तर माध्यमिक गटात इयत्ता 9 वी ते 12 वी .प्राथमिक विभागातून सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज सैनिक विद्यालय उदगीर, द्वितीय क्रमांक लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर तर तृतीय क्रमांक अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालय उदगीर या शाळांनी क्रमांक पटकावला. तर माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक साने गुरुजी माध्यमिक विद्यालय उदगीर,द्वितीय क्रमांक श्यामार्य कन्या विद्यालय उदगीर तर तृतीय क्रमांक विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर यांनी क्रमांक पटकावला आणि शिक्षक गटातून माधव खिंडे (अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालय उदगीर ) यांनी क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन देविदास खिंडे यांनी तर आभार सुनिल कल्लूरकर यांनी मानले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
