शिवजयंती निमित्त उपविभागीय व तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण
पुरग्रस्तांच्या कुटूंबीयांना ६ लाख रुपयांचा धनादेश वाटप
अहमदपूर( गोविंद काळे )शिवजयंती निमित्त अहमदपूर येथील उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात अहमदपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच यावेळी महेश अर्बन बँकेच्या वतीने वृक्षारोपणाच्या बाजूच्या सेफ्टी लोखंडी जाळ्या भेट देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे साहेब, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी कुदळे साहेब, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सभापती शिवानंद हेंगणे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृतीराव कांबळे साहेब, संचालक डि.के. जाधव, महेश बँकेचे सरव्यवस्थापक बी.के. क्षिरसागर साहेब, जि.प. सदस्य माधव जाधव, माजी सभापती शििवाजी खांडेकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, अशोक सोनकांंबळे, नगरसेवक फुुजल जहागीरदार, शाम देवकते, नायब तहसिलदार पे६ेवाड, राठोड, पेशकार मद्दे, महसुल सहाय्यक रमेश कांबळे, अर्जुने, तलाठी शामभाऊ कुलकर्णी, नागदरेे, खोमणेे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थितीी होती. तसेच तहसिल कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पूरग्रस्त मध्ये निधन पावलेल्या कुटुंबियांना आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते धनादेश देप्यात आला. यामध्ये अंधोरी येथील पूरग्रस्त शेख रबाना रजाक यांना 4 लक्ष रुपये व शेख वाहिद रजाक यांना 2 लक्ष रुपये ची अशी एकुण 6 लक्ष रुपये चा धनादेश देण्यात आले.