शिवजंयती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश.

शिवजंयती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश.

अहमदपूर (गोविंद काळे) : सार्वजनिक छत्रपती महोत्सव समिती अहमदपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेत यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांने भरीव यश संपादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.आस्मिता ईप्पर प्रथम क्रमांक 3 हजार रुपये तर व्दितीय कु.अरुंधती फुलारी 1500 रुपये ,तृतीय कु.अंजली स्वामी 1000 रुपये बक्षिस व सुफियान तांबोळी यास उत्तेजनार्थ बक्षिस व सन्मान चिन्ह तसेच मॅरेथॉन स्पर्धेत श्रध्दा पट्टेवाड हीने तृतीय पारितोषिक पटकावले आहे.वरील सर्व यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांना
मा.मंत्री बाळासाहेब जाधव,जि.प.सदस्य माधवराव जाधव,नगरसेवक सिद्धार्थ सूर्यवंशी, महोत्सव समितीचे अध्यक्ष साईनाथ पाटील,हुसेन मनीयार,ईप्पर सर, मुकेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर येथे मोठ्या उत्साहात हा बक्षिस वितरण सोहळा पार पाडला.यावेळी हजारोच्या संख्येने मावळे उपस्थित होते.
वरील विद्यार्थ्यांना कला शिक्षक महादेव खळुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव दलितमित्र,शिक्षणमहर्षी,
डी.बी.लोहारे गुरुजी मुख्याध्यापक बालाजी बिरादार उपमुख्याध्यापक प्रेमचंद डांगे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, रमाकांत कोंडलवाडे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author