शिवरायांची शिवनितीच युवकांना तारेल – प्रा.मारोती बुद्रुक

शिवरायांची शिवनितीच युवकांना तारेल - प्रा.मारोती बुद्रुक

शिवजयंतीनिमित्त मुलांनी घेतली निर्व्यसनी राहण्याची शपथ

लोहा (गोविंद काळे) : छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यात अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची अनुभूती येते त्यांची दूरदृष्टी सहकार्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांची शिवनितीच युवकांना तारेल असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
कांजाळा ता.लोहा येथे छत्रपती शिवगर्जना प्रतिष्ठाण शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळ ब्रम्हचारी वैरागी महाराजांचे पुजारी नराब साधु महाराज,कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच गुणाजी पाटील लोहकरे प्रमुख अतिथी उपसरपंच गणपत जाधव, देविदास लोहकरे दिगंबर लोहकरे,गाजनन बागल,दत्ता आढाव बोरगावकर,संतोष पाटील कापसीकर,उपसरपंच बाबुराव जाधव तसेच खमरोदिन शेख,माधव राजु भोंग आदी मान्यवरांची उपस्थिती होती.पुढे बोलताना प्रा.मारोती बुद्रुक पाटील म्हणाले की आज भरकटत चाललेल्या तरुण पिढीला शिवरायांचे विचारच प्रेरणादायी आहेत. शिवरायांनी 360 गडकोट किल्ले बांधले ते किल्ले आजही शिवरायांच्या कार्याची साक्ष देतात शिवरायांनी जातीभेद केला नाही. शिवरायांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत. शिवरायांना मंदिर आणि मस्जिद तेवढेच प्रिय होते आज शाळेत चित्रकला शिकविली जाते पण चरित्र शिकवलं जात नाही,टाकीचे घाव सोसावे लागतात,स्वताला जमिनीत गाढून,स्वतःला ताऊन सुलाखून घ्यावं लागतं तेव्हाच आयुष्याचा सुगंध पसरू लागतो त्यामुळेच शिवरायांच्या शुद्धतेचा अजूनही गंध या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तो युवकांनी कपाळी लावावा असे भावनिक आवाहन ही बुद्रुक पाटील यांनी केले.कांजाळा गावात पहिल्यांदाच दारात रांगोळी घरात पुरणपोळी शिवरायांच्या विचारांची दिवाळी साजरी झाली. शिवरायांच्या महाआरतीने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शिवजयंती आलेल्या युवक-युवतींनी व्याख्यान ऐकून आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भाषण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष माधव चांदोबा लोहकरे,उपाअध्यक्ष रामेश्वर लोहकरे,सचिव कैलास लोहकरे कोषाध्यक्ष नारायण नागोराव भोंग, सदस्य:श्याम लोहकरे,विकास संभाजी लोहकरे, बालाजी लोहकरे, अशोक लोहकरे,नारायण लोहकरे, प्रभाकर बालाजी पलोहकरे, तिरुपती भोंग यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

About The Author