राज्यस्तरीय ए आय यू बॅडमिंटन निवड चाचणीला कै. बी.व्ही काळे आयुर्वेद महाविद्यालयात प्रारंभ
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व कै बी व्हि काळे आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यातील आयुर्वेद, मेडीकल, डेंटल, नर्सिंग, फिजिओथेरपी इत्यादी महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित कै. बि.व्ही. काळे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ए आय यु निवड चाचणी बॅडमिंटन 2022 स्पर्धेचे आयोजन लातूर येथील सुशीला देवी महाविद्यालय बॅडमिंटन हॉल येथे आयोजित आयोजित केले असून त्याचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला या स्पर्धेत राज्यातून आयुर्वेद मेडिकल डेंटल नर्सिंग फिजिओथेरपी इत्यादी या महाविद्यालयातील 120 विद्यार्थी स्पर्धक व साठ विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कै. बी व्ही काळे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासकीय अधिकारी डॉ आनंद पवार, पत्रकार हरिराम कुलकर्णी, विद्यापीठ प्रतिनिधि म्हणुन तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई चे प्रा. बालाजी थोरबोले डॉ. शरद साळुंखे वाय एम टी आयुर्वेद कॉलेज मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून धन्वंतरीचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ आनंद पवार यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बी व्ही काळे आयुर्वेद महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत होत असलेल्या राज्यस्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन आम्हीं मागील 20 वर्षापासून करत असून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबच त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी त्यांना देश व राज्य पातळीवर विविध स्पर्धा मध्ये भाग घेण्यासाठी ह्या उपयुक्त चाचणी असून त्या निश्चित भविष्यात मुलांना यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील तसेच देशाचे क्रीडा क्षेत्रात नाव मोठे करण्यास प्रवृत्त करतील असे सांगून त्यांना शुभेछा दिल्या यावेळी विद्यापीठ प्रतिनिधी प्रा. बालाजी थोर्बोले, डॉ शरद साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातून टीम कोच आलेले आहेत डॉ आनंद मारगुडी, प्रा. चौधरी, प्रा. कदम सर, प्रा गायकवाड, प्रा. नंदकिशोर सगरे, प्रा.थोरात , गिरीश भवरे, संदीप कापसे, प्रा. शेख, अश्विनी आहेर, डॉ सिद्दीकी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ नाईकवाडी यांनी केले व सर्व आयोजन आणि संयोजन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री शिवाजी कदम यांनी केले आहे.
योग्य नियोजनाचे बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर खेळाडू कडून कौतुक
दोन दिवसीय चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत राज्यांतील मेडीकल महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कैलास बी. व्ही. काळे महाविद्यालयातील नियोजनाचे कौतुक केले या परिसरातील वृक्ष, मॉर्निंग वॉक ग्राउंड, निवास व्यवस्था आदींची व्यवस्था बघून लातूरच्या मांजरा ट्रस्ट संचलित संस्था पदाधिकारी प्रशासनाचे डॉक्टर मंडळी यांनी नियोजनाचे कौतुक केले.
