सुमेधा गुट्टे यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सुमेधा ज्ञानोबा गुट्टे यांना नुकताच महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परीषदेचा राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार नांदेङ येथील कुसूम सभागृहात मा. खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर आम आदमी पार्टी चे सचिव धनंजय शिदे अॅङ.गजानन कदम म.फूले शिक्षक परीषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.सुमेधा गुटटे या सहशिक्षिका असून त्या देवकरा या गावच्या रहिवाशी आहेत. त्यांनी केलेल्या शैक्षणिक योगा वृक्ष लागवङ व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने सन्माननीत केले आहे.
