लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर राहील – आ.संजय बनसोडे

लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर राहील - आ.संजय बनसोडे

लातूर (एल.पी. उगिले) : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष संघटन बांधणी प्रभावी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. याचा एक टप्पा म्हणून लातूर येथील स्वामी विवेकानंद चौक येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ संपन्न झाला. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पक्षापेक्षा अग्रेसर राहील असा विश्वास याप्रसंगी माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करताना बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा निरीक्षक डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद भैया सावे, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव बेद्रे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव संघटन मुक्ती फैयाज, प्रदेश सचिव आखतर मिस्त्री, लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भैय्या पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मुर्तुजा खान, फारूक तांबोळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख, प्रशांत घार, माजी नगरसेवक नवनाथ अल्टे , माजी नगरसेवक राजा मणियार, माजी नगरसेवक विनोद रणसूभे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, माजी नगरसेवक अनिल गायकवाड, लाला सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जाकीर तांबोळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणून शरद पवार साहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून सर्वसामान्य माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे घराघरापर्यंत पोहोचवणे आणि प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कार्यकर्ते जितके सक्रिय होतील, तितकी पक्ष संघटना बांधणीला गती येईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About The Author

error: Content is protected !!