येत्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रात अखिल भारतीय सेनेची ताकद वाढलेली दिसेल : आशा गवळी (मम्मी )
पुणे (प्रतिनिधी) : वडगांव पिर ता . अंबेगांव जि.पूणे . येथे .अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख माजी आमदार अरुणभाई गवळी(डॅडी) ह्यांच्या आशीर्वादाने व पक्ष राष्ट्रीय सरचिटणीस सौ आशा ताई गवळी(मम्मी) ह्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांची बैठक संपन्न झाली .
या बैठकीस मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या . या बैठकीत पदाधिकारी ह्यांचा कामाचा आढावा व कार्य अहवाल ह्यांची पाहणी पक्षश्रेष्ठींमार्फत करण्यात आली . पूढे त्या म्हणाल्या की,येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात अखिल भारतीय सेनेची ताकद अधिक वाढलेली दिसेल. अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस सौ आशाताई गवळी(मम्मी) यांनी असा विश्वास दर्शवला आहे .
आगामी निवडणुका केंद्रस्थानी ठेवून पक्षाची फळी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे .तसेच काही राजकारणी आपल्या सत्तेचा गैरवापर करुन प्रशासनास पुढे करुन निष्पाप व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत .हे सर्व कश्यासाठी केले जात आहे?
सत्तेच्या लालसासाठी आखिल भारतीय सेना आजही समाजसेवा व जनतेचे प्रश्न पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोडवून संघटन मजबूत करीत आहे .आगामी निवडणुका मध्ये अखिल भारतीय सेना लढणार असुन ह्या बाबत कार्यकर्तांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेतला जाईल, व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्यांना संधी देऊन पक्षात चांगले काम करणान्यांना बढती देण्यात येणार आहे , परंतु जे पदाधिकारी क्रियाशील नाहीत ,त्यांच्या जागी नवीन लोकांना संधी दिली जाईल.
काही जिल्ह्यात बहुतेक पदाधिकारयांचा लवकरच खांदेपालट करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मुलाखती ह्या पक्ष कार्यालयात घेऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल .काही ठिकाणी नव्या दमाच्या कार्यकर्त्यानची निवड मुलाखतीद्वारे करु असं त्यांनी सांगितले.व या बैठकीस उपस्थित न राहणाऱ्या पदाधिकारयांबाबत ठोस निर्णय घेऊन त्यांना पदावरुन हटवण्यात येणार आहे. जे एकनिष्ठ आहेत ते आहेत. ज्यांना पुन्हा नव्याने काम करायची ईच्छा आहे, अश्या पदाधिकार्यकर्त्या बाबत विचार केला जाईल.
तसेच प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार उभे करून अखिल भारतीय सेना सर्व जागा लढणार…. असे त्या म्हणाल्या
या आढावा बैठकास महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते . या बेढकीचे सुत्रसंचालन विशवनाथ गायकवाड लातुर यांनी तर आभार शनिभाऊ श्रंगारे पूणे यांनी केले.
