जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन व प्रशासकीय इमारतीचा संयुक्त आराखडा सादर करावा

जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन व प्रशासकीय इमारतीचा संयुक्त आराखडा सादर करावा

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी

लातूर (प्रतिनिधी) : जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या जागेत जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, नियोजन भवन व प्रशासकीय इमारतीचा संयुक्त आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा लातूर शहराच्या मध्य भागात येतो त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नियोजन भवन व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या भागातच होणे ही नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी मल्टी स्टोर इमारतीचा संयुक्त आराखडा सादर करावा. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा स्तरावरील सर्व कार्यालये एकाच छताखाली आणावीत, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी चा आराखडाही सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व त्यातील विविध कार्यालयाची व जागेची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेच्या जागेची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या समोरील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जागेची माहिती जागेच्या नकाशा द्वारे दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, उपअभियंता रोहन जाधव, लातूरचे उपविभागीय अधिकारी सुनील यादव, औसा रेनापुर चे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार स्वप्निल पवार, ॲड. किरण जाधव, व्यंकट बेद्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

About The Author