धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर येथे मराठवाडा(हैद्राबाद)मुक्ती संग्राम दिन-सप्ताह निमित्ताने:- 16 ते 22 सप्टेंबर 2022 रोजी मोफत रोगनिदान व औषधी-पंचकर्म उपचार शिबीर
उदगीर(प्रतिनिधी) : धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मराठवाडा(हैद्राबाद)मुक्ती संग्राम दिन-सप्ताह निमित्ताने हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य आणि सर्वांसाठी आरोग्य आयुर्वेदा फॉर न्यूट्रिशन या संकल्पनेनुसार मोफत सर्वरोग निदान व आवश्यकतेनुसार औषधी-पंचकर्म उपचार शिबिर दिनांक:-16 ते 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 08.30 ते दुपारी 01.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
आमवात,संधिवात,पक्षाघात(लकवा पॅरालिसीस),मणक्याचे विकार,आम्लपित्त,मधुमेह,मुळव्याध,त्वचाविकार,लठ्ठपणा,हर्निया,हायड्रोसिल,मोतीबिंदू,नेत्ररोग,दंतरोग,श्वसनाचे विकार,पोटाचे विकार,लहान बालकांचे आजार,श्वेतप्रदर,रक्तप्रदर व मासिक पाळी समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर या शिबीरामध्ये मोफत औषधी-पंचकर्म उपचार करण्यात येणार आहे.रोगनिदान विभागाच्या वतीने रक्त व लघवी तथा एक्स-रे व ई.सी.जी. तपासणी नि:शुल्क करण्यात येणार आहे.
तरी या मोफत शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील,डॉ.राजेंद्र धाटे,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.रविकांत पाटील,डॉ.उषा काळे,डॉ.पुष्पा गवळे,डॉ.अमोल पटणे,डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.रश्मी चिद्रे,डॉ.अस्मिता भद्रे,डॉ.योगेश सुरनर,डॉ.दिपीका भद्रे,डॉ.नम्रता कोरे,डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.शिवकुमार होटुळकर,डॉ.विष्णुकांत मुंढे,डॉ.ओम चिट्टे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.
