मनसे शेतकरी सेनेच्या तालुका उपाध्यक्षपदी अजय भंडे यांची नियुक्ती

मनसे शेतकरी सेनेच्या तालुका उपाध्यक्षपदी अजय भंडे यांची नियुक्ती

उदगीर (एल.पी. उगिले) : राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संतोषभाऊ नागरगोजे प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेशाध्यक्ष शेतकरी सेना यांच्या सूचनेवरून संजय राठोड जिल्हाध्यक्ष लातूर यांच्या हस्ते अजय भंडे यांची शेतकरी सेनेच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
अजय भंडे हे स्वतः कृषी पदविका उत्तीर्ण असून शेती विषयात त्यांना शास्त्रशुद्ध ज्ञान असल्याने तसेच वेळोवेळी ग्रामीण भागात शेतकरी प्रश्न विषय सातत्याने लढण्याची भूमिका घेणारे अजय भांडे यांच्या शेती, शेतकऱ्या विषयीची तळमळ पाहून त्यांना शेतकरी सेनेच्या पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.असे मनसे चे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांनी सांगितले.
यावेळी त्यांना भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नियुक्तीप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष बापूराव जाधव, शाखा प्रमुख बिरबल मेहेत्रे, दत्ता कारलेवार, श्रीमंगले राम, कोरके अर्जुन, आत्माराम बिरादार, अजय बिरादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!