साईनाथ पवार याला एम एच टी सीईटी परीक्षेत ९९.९८ पर्सेंटाइल
उदगीर (एल.पी.उगिले) : येथील साईनाथ पवार या विद्यार्थ्यांने एम एच टी सीईटी परीक्षेत ९९.९८ पर्सेंटाइल प्राप्त केले आहेत.
साईनाथने अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन नीट व जेईई या दोन्ही परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले होते. त्यासोबतच एम एच टी सीईटी परीक्षेत ही उज्ज्वल यश संपादन करत ९९.९८ पसेंटाईल घेतले आहेत.
साईनाथ याने अगोदर नीट परीक्षेत ९९:८६ पर्सेंटाइल तर जेईई परीक्षेत ९६:९७ पर्सेंटाइल गुण प्राप्त केले होते.
विशेष म्हणजे त्याला दहावी व अकरावीमध्ये चांगले गुण असल्यामुळे कोनाळे कोचिंग क्लासेस ,नांडेड ( भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र) तसेच आय आय बी कोचिंग क्लासेस नांडेड (जीवशास्त्र) यांनी कसलीच फिस न घेता त्याला शिक्षण दिले आहे. त्यामुळे त्याने यश संपादन केले. कठीण परिस्थिती यावर परिश्रम व मेहनत करुन मात देता येते. हेच साईनाथने आपल्या या निकालातून दाखवून दिले आहे.
त्यामुळे परिसरातील नातेवाईक, शिक्षक व मित्र परिवार हे सर्वजण त्याला व त्याच्या आई, वडील यांना शुभेच्छा देत आहेत.
