लोणीमोडच्या जि. प.प्रा.शाळेत “वृक्षदिंडी”व वृक्षारोपण संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण शाळेच्या जेष्ठ शिक्षीका सुगंधी भाग्यलक्ष्मी यांच्या शुभहस्ते करण्यात आला . त्यानतंर “वृक्षदिंडी” काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी च्या दुसऱ्या दिवशी वृक्षदिंडी व वृक्षारोपण आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत लोणीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघमारे तर प्रमुख पाहुणे ग्रामसेवक शरद जाधव, सरपंच पती यमुनाजी भुजबळे, उपसरपंच वैजनाथ बिरादार, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख,एकबाल शेख, दयानंद पटवारी, ग्रा.प.सदस्य पती शिवकांत मुळे, अंकुश केंद्रे, शा.व्य.समीती अध्यक्ष शादुल शेख, निर्मला वाघमारे,ज्ञानेश्वर गायकवाड, नारायण बांवचे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईल चा अतिवापर केल्यामुळे दुष्परिणाम , पर्यावरण संवर्धन शपथ, सैंद्रीय खत शेतीचे महत्व, वृक्षसंवर्धन व संरक्षण या विषयीचे महत्व मार्गदर्शन केले यावेळी विद्याथीॅ पालक उपस्थीत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त दि 13/8/2022 रोजी विद्यार्थ्यांना गोपाळ पंगत अंतर्गत सफरचंदाचे वाटप करण्यात आले तर दि 14/8/2022 रोजी ग्रामपंचायत लोणी मार्फत शेंगदाणा लाडू व बिस्किटे वाटप करण्यात आले. तसेच शिवकांत मुळे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ साठी 250 रू दिले.
