सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे मध्ये 252 रुग्णांची तपासणी
उदगीर (एल.पी.उगिले) : या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती
तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन या मान्यवरांची होती.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत आरोग्य दूत उपक्रमा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या मोफत आरोग्य शिबिरात 252 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, दिंडोरी येथून आलेले डॉ.दिलीपकुमार पाटील, डॉ. चारुशीला पाटील, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चे सचिव व्ही.एस कणसे, अरविंद मामडगे, पत्रकार व्ही.एस. कुलकर्णी, प्रदीप बेंद्रे, विपिन जाधव,माधव सूर्यवंशी, एन.आर जवळे, बिपिन पाटील, शिवा गोरे,बाबासाहेब देशमुख, नागेंद्र काकडे, सचिन बामनपल्ले,सरिता द्वासे, माधव स्वामी, विनायक गादा , बेद्रे,रेखा जाधव,मीना तेलंग,मनीषा कलमे,मीरा जाधव, ऋतुजा कोतवाडे यांच्यासह कार्यरत सेवेकरी, सेवेकरी, तपासणीसाठी आलेले रुग्ण, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.