महाराष्ट्रातील नामांकीत शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी
मा.ना.विजयकुमारजी गावित यांचे सहकार्य – शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये सन 2012-13 पासुन आदीवासी विद्यार्थ्याना खाजगी इंग्रजी शाळामध्ये शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्या विद्यार्थ्याचे विविध प्रश्न गेल्या 3 वर्षापासुन प्रलंबीत होते. ते प्रश्न मागील सरकारने सोडविले नाहीत. त्यामुळे नविन सरकार मधील आदीवासी विकास मंत्री मा.ना.विजयकुमारजी गावीत यांच्या सोबत महाराष्ट्र नामांकीत इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्याचे सचीव माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली ना.गावीत यांच्या बरोबर शाळेची तपासणी वर्षातुन एक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करतील, 10 वर्षापासुन फिस वाढ झाली नाही ती वाढवण्यात यावी अशा विविध प्रश्नावर ना.गावीत साहेबांनी सकारात्मक भुमीका घेतल्याचे कव्हेकर यांनी सांगीतले.यावेळी प्रधान सचिव अनुपकुमारजी यादव उपसचिव विजेसिंग वसावे, सर्व एटीसी व संघटनेचे सुभाष चौधरी धुळे, श्री.नाथानी नंदूरबार, दिलीप पाटील नांदेड, सौ.मिनलताई खतगावकर, सुधीर जगताप उदगीर आदी उपस्थीत होते.