प्रोफेसर डॉ.नरसिंग कदम यांना गुरुवर्य पुरस्कार जाहीर

प्रोफेसर डॉ.नरसिंग कदम यांना गुरुवर्य पुरस्कार जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयातील कवी, कथाकार, वात्रटिकाकार व समीक्षक प्रोफेसर डॉ नरसिंग कदम यांना गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाचा यावर्षीचा गुरुवर्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ प्रत्येक वर्षी शैक्षणिक, सामाजिक कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार देत असते. यावर्षी कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. डॉ कदम यांचे अनेक कवितासंग्रह, संपादित ग्रंथ तसेच अनेक वर्तमानपत्रातून लेख व अनेक मासिकातून समीक्षा लेखन प्रकाशित झालेले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी सामाजिक कार्य करत असताना प्रबोधन पर रॅली, व्याख्याने, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन , शोषखड्डे , जाणीव जागृती शिबिरे ,रक्तदान शिबिरे, रक्तगट तपासणी शिबिर, पशुरोग निदान शिबिर, कुष्ठरोग निर्मूलन रॅली, पल्स पोलिओ रॅली, असे विविध उपक्रम राबविलेले आहेत, सहभाग घेतलेला आहे. यापूर्वीही त्यांना साहित्यिक कार्याबद्दल, सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष अशोकराव पाटील ,सचिव ज्ञानदेव झोडगे ,प्राचार्य डॉ विनायकराव जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

About The Author