पेपरलेस ग्रामपंचायत संगणक केंद्र चालकांचा व ग्रामसेवकांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतचा कारभार पेपरलेस झाला असुन यात उत्कृष्ट कार्य केलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांचा व ग्रामसेवक यांचा पंचायत समिती सभागृह येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ( दि१६ सप्टे ) रोजी सत्कार करण्यात आला आता या गावात, ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातुन ग्रामपंचायत चे सर्व दाखले, तहसील चे सर्व दाखले, सिएससी च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुविधा गावातच मिळणार आहेत.याविषयी सविस्तर माहीती अशी की, तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीचा कारभार आता पेपरलेस झाला असुन यात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिरूर ताजबंद- मारोती सरवदे, हाडोळती- सुमित चापटे, किनगाव – प्रीतम कांबळे, सताळा- अनंत स्वामी, कुमठा बु.- खंडेश्वर राघुमोड, शिवनखेड- सुर्यकांत काटे, वळसंगी- शिवशंकर रुद्रवाड, बेलूर- परशुराम सूर्यवंशी, विळेगाव- गंगाधर स्वामी, माळेगाव खु.- मीराबाई बनसोडे, कोलवाडी- प्रमोद शिंगडे, मावलगाव- सविता मिटकरी, परचंडा- अर्चना काणेकर, गंगाहिप्पारगा- त्रिभुवन काडवदे, उन्नी जांब – रविकुमार गायकवाड, हिप्परगा काजळ- अनुराधा नायने. ग्रामपंचायत संगणक केंद्र चालकांचा व महात्मे एस एन, मोहन केंद्रे, मुळे हनुमंत, राजाराम पाटील, उत्तमराव भदाडे, गुट्टेवाडीकर गोपाळ, राजेंद्र कांबळे, इब्राहिम पिंजारी फुलमंटे कृष्णा, शदेवर्षे, सचिन तावरे, आकनगिरे एस व्ही,चात्रे व्ही एम, वनाळे एस एस, डोंगरे पी जे, पोद्दार बालाजी आदी ग्रामसेवकांचा अहमदपूर – चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दि १६ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभाग्रह येथे प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.या ‘ग्रामपंचायतीचा कारभार ‘पेपरलेस’ झाल्याने जुने रेकॉर्ड सीलबंद करण्यात आले आहे. यापुढे ‘ई-गव्हर्नन्स’च्या ३३ सेवा गावातच मिळणार आहेत. गावातील विकासकामांवर किती निधी खर्च झाला, याची माहितीही ऑनलाइन मिळणार आहे. गावातील लाभार्थ्यांचे अनुदान किंवा ठेकेदारांची बिलेही थेट बँकेतच जमा होतील. यावेळी यावेळी गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि. प सदस्य माधवराव जाधव, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, गटशिक्षणाधिकारी ढोकाडे, तालुका आरोग्य अधिकारी दासरे, तालुका व्यवस्थापक अरुण पोपलयात विस्तार अधिकारी,पट्टेवाड रमाकांत, नल्ले सिद्राम, केंद्रे सतीश, ऍड सादिक शेख, चंद्रकांत गंगथंडे, धनराज बोडके, बाळु पवार, नारायण सुर्यवंशी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, ऑपरेटर कर्मचारी, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.