साम्राट चंद्रगुप्त मौर्य स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

साम्राट चंद्रगुप्त मौर्य स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सम्राटचंद्रगुप्त मौर्य स्कूल मध्ये हिंदी दिवस अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या समारोहासाठी प्रमुख पाहुणे  तथा अध्यक्ष म्हणून डॉ. पांडुरंग चिलगर सर उपस्थित होते. या समारोहासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून  शाळेचे संचालक श्री.कुलदीपभैया हाके पाटील तथा संचालिका श्रीमती शिवालिका कुलदीप हाके पाटील, प्राचार्य नागरगोजे सर, श्री. आरादवाड सर उपस्थित होते. समारोहाच्या सुरवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती व भारतमातेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार समारंभा नंतर शाळेतील हिंदीच्या शिक्षिकांचा सन्मान व सत्कार प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला. शाळेतील विविध विध्यार्थ्यांनी हिंदी दिवसानिमित्त हिंदी काव्य वाचन, हिंदी शायरी,हिंदी भाषणे व हिंदी गिते सादर केली. आदरणीय डॉ. पांडुरंग चिलगर सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की 10 जुन 2022 रोजी युनो मध्ये हिंदी माध्यम भाषा म्हणून स्वीकारण्यात आली.तसेच त्यांनी सांगितले की हिंदी अनिवार्य भाषा होईल व जो बहुभाषित असतो तो विद्द्वान असतो. या समारोहाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश दादा हाके पाटील तथा सचिव श्रीमती रेखाताई तरडे मॅडम यांनी केले. या समारोहाचे सूत्रसंचलन शाळेची विद्यार्थिनी कु.माहीन सय्यद हिने केले तर आभार कु. यशश्री वारलवाड हिने मानले. समारोहाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील प्राचार्या, उप प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले.

About The Author