पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालयात हिंदी दिवस साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी(सु) येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संकुलातील हिंदी विषयशिक्षक उच्च माध्यमिकचे रमेश चेपूरे आणि माध्यमिकच्या कौशल्या देवकत्ते यांचा संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कौशल्या देवकते यांनी हिंदी दिनाबाबत विस्तृतपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी घोबाळे अक्षरा, शेख अनमफातेमा, सुरनर तनुश्री, शेख सुमय्या, देवकते शिवानी, सुरनर शाहू, देवकते कोमल, सुरनर प्रतिमा, हानवते सुमेध या विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे या होत्या तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ भाऊसाहेब आंधळे उपस्थित होते. यावेळी तरडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हटले की, हिंदी भाषा ही जशी राष्ट्रालाच जोडते तशी ती माणसातील आपलेपणा सुद्धा जोडते. अतिशय सोपी आणि सोज्वळ भाषा म्हणून आपण पहातो.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिलानी शेख यांनी केले तर आभार संतोष मुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार बुर्ले, तुकाराम शिंगडे, प्रदीप रेड्डी,अमोल सारोळे, रमेश चेपूरे, अच्युत सुरनर, संभाजी दुर्गे, चिंतन गिरी, दैवशाला शिंदे, मिनल गोगडे, जनार्दन मासुळे, गजानन फुलारी, गणेश जाधव, हिदायत शेख, विश्वंभर सुरनर, संजय कज्जेवाड, विवेकानंद सुरनर, अनंत उदगिरे आदींनी परिश्रम घेतले.