चित्ता आगमनाचे वन विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाविद्यालयामध्ये जल्लोष

चित्ता आगमनाचे वन विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाविद्यालयामध्ये जल्लोष

अहमदपूर (गोविंद काळे) : तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतीय जंगलात पुन्हा एकदा चित्ता नावाचा प्राणी दाखल होणार आहे त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी अहमदपूर श्रीमती ए. व्ही. अपेट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जल्लोष साजरा केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्या रेखाताई तरडे -हाके या होत्या तर व्यासपीठावर वनपरिमंडळ अधिकारी जी.एन.माळी, व्याख्याते म्हणून प्रा.डाॅ.दिगंबर नागोराव माने तसेच वनरक्षक आर.आय.कलशेट्टी , वनरक्षक बी. एच. गडकर, पु अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब आंधळे हे होते. याप्रसंगी डॉ माने म्हणाले की,आज भारतीय जंगलातील काही प्राण्यांची संख्या कमालीची कमी होत आहे.ते पर्यावरणाकरिता घातक आहे.करिता भारत सरकार आफ्रिकेच्या जंगलातून १७ सप्टेंबर ला चित्ताची जोडी घेऊन येत आहे ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.त्यामुळे प्रत्येक भारतीय या आनंदोत्सवात सहभागी आहे.यावेळी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब आंधळे आणि वनरक्षक कलशेट्टी यांनी सुद्धा पर्यावरण आणि वन यावर मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या रेखाताई तरडे म्हणाले की वन विभागाचा हा खूपच स्तूत्य उपक्रम असून सर्वांनीच पर्यावरण रक्षणासह संवर्धनासाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन शेख जिलानी यांनी केले तर आभार संतोष मुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. चित्ता व इतर वन्यप्राणी यांचे संरक्षण व संवर्धन करावे असे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author