यशवंत विद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालया च्या प्रांगणामध्ये मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने शाळेत भाषण, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी मंचावरती उपप्राचार्य गिरिधर घोरबांड, उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे सह एन सी सी, स्काऊट गाईड चे विद्यार्थी, पालक, महिला आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर व्ही पाटील यांनी सूत्रसंचलन के डी बिराजदार यांनी तर आभार रामलिंग तत्तापूरे यांनी मांनले.

About The Author

error: Content is protected !!