अहमदपूर येथे सार्वजनिक ध्वजारोहण उत्साहात साजरा

अहमदपूर येथे सार्वजनिक ध्वजारोहण उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जिल्हा परिषदेच्या शासकीय प्रांगणामध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने तालुक्याचा शासकीय ध्वजारोहण सोहळा उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण फुलारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर आंदोरीकर, नायब तहसीलदार गणेश दंडाळे ,एम एस पेदेवाड यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी पुढारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या समयी स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार जगदीश रंगनाथ पाटील यांचा उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचलन सहशिक्षक रामलिंग तत्तापुरे यांनी तर आभार गौरव चंवडा यांनी मांडले.

About The Author

error: Content is protected !!