नवनिर्मित सावित्री व परिवर्तन लायनेस क्लबचा ऑनलाईन पदग्रहण सोहळा

नवनिर्मित सावित्री व परिवर्तन लायनेस क्लबचा ऑनलाईन पदग्रहण सोहळा

नवीन लायनेस क्‍लबचा उपक्रम : प्रत्येक पदाधिकार्‍यांनी जबादारी व सेवाभाव वृत्तीने काम करण्याची घेतली शपथ

लातूर (प्रतिनिधी) : येथील लायन्स इंटरनॅशनल क्लब, लायनेस क्लब डिस्ट्रिक्ट 3234 एच2 व लायनेस क्लब लातूर अंतर्गत नवनिर्मित सावित्री लायनेस क्लब लातूर व परिवर्तन लायनेस क्लब, गांजूर या दोन्ही नूतन क्लबची स्थापना 2020- 21 मध्ये करण्यात आली, यांचा पदग्रहण सोहळा ऑनलाइन पध्दतीने संपन्न झाला. या विधायक उपक्रमाला महिला पदाधिकार्‍यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या या सामाजिक कार्याचा आदर्श इतर लायनेस क्‍लबसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायनेस डिस्ट्रिक्ट क्लबच्या उपप्रांताध्यक्षा लाय. प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले. याप्रसंगी ऑल इंडिया लायनेस क्लबच्या अध्यक्ष लाय/लायनेस डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी नवनिर्वाचित सावित्री लायनेस क्लब लातूर अध्यक्ष- लायनेस शितल वाडीकर, सचिव- लाय.सुनिता मुचाटे, कोषाध्यक्ष- लायनेस सोनाली पाटील तसेच परिवर्तन लायनेस क्लब (दत्तकगाव) गांजूरची अध्यक्ष-योजना भोसले, सचिव- मोहर कुंभार व सोनिया लटपटे,कोषाध्यक्ष- लायनेस कौशल्या मोरे, उपाध्यक्ष-लायनेस सुनंदा जाधव, पीआरओ- लायनेस संगीता लटपटे, संयोजिका- किश्किंदा घोटकर आदींना पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ऑनलाईन शपथ देऊन प्रत्येक पदाची जबाबदारी आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी लायनेस डिस्ट्रिक्ट प्रांताध्यक्ष लायनेस सुनंदा गुप्ता, क्षेत्रीय संयोजिका लायनेसस्मिता मित्तल, लातूर लायनेस अध्यक्ष तथा सरपंच लाय. डॉ कुसुम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पूर्वप्रांताध्यक्ष लायनेस बीना चावला,लायनेस उषा बाहेती,लायनेस उषा नागपाल, माजी अध्यक्ष लायनेस प्रा.कौसल्या खोसे- जाधव, लातूर लायनेस सचिव तथा मल्टिपल कॅबिनेट ऑफिसर लाय/लायनेस. प्रोफेसर संजयादेवी गोरे-पवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास उपाध्यक्ष-लायनेस विद्या देशमुख, कोषाध्यक्ष-लायनेस मिनाक्षी विभूते, लायनेस श्रद्धा पाठक, लायनेस डॉ. क्रांती मोरे, लायनेस डॉ.प्रभावती वाडकर, लायनेस डॉ. उमा कडगे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. या कार्यक्रमानिमित्त लातूर लायनेस क्लबने दत्तक घेतलेले गाव गांजूर येथे कोरोना जनजागृतीकरीता पत्रके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लायनेस अरुणा कांदे यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला नवनिर्वाचित सावित्री लायनेस क्‍लब,लातूर व परिवर्तन लायनेस क्‍लबच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थिती होती.

About The Author