भारतीय जनता युवा मोर्च्याच्या लातूर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र बोकन यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्च्याच्या लातूर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र बोकन यांची निवड करण्यात आली असून या संबंधीचे नियुक्तीपत्र भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भारतीय जनता युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे,स्वातीताई जाधव,दिपक मठपती आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल भरत चव्हाण,गोरख सारगे,अर्जुन माने,दुर्गेश चव्हाण,गणेश पवार,योगेश गंगणे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकार्याकडून त्यांचे कौतुक होत आहे.