नवनिर्वाचीत पणन महासंघाचे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

नवनिर्वाचीत पणन महासंघाचे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्य कार्यालयात पणन महासंघाचे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत पणन चे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना अनेक सुचना केल्या. यामध्ये खरेदी केलेला कापुस साठवणुकीची व्यवस्था, सोयी सुविधा, इतर नैसर्गिक आपत्तीपासुन संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदाम, शेड इ. ची व्यवस्था करावी. बाजार समितीच्या स्तरावर शेतकरीनिहाय रेकॉर्ड ठेवले जावे. कापूस खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कापुस खरेदीचे ठिकाण, वेळ एसएमएसव्दारे पाठवण्यात यावे. कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात तसेच शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. अशा अनेक सुचना चेअरमन व आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक एस.बी. तेलंग (भाप्रसे ), सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैया पाटील, सरव्यवस्थापक एस.एम. ठोंबरे, प्र. व्यवस्थापक डॉ.ए.एन. नेरकर, सरव्यवसापक पी.पी.ओक, व्यवस्थापक एन.बी. यादव, प्र. व्यवस्थापक एम.डी. ढेकाणे, कायदा अधिकारी ए.आर. महाडिक, प्र. व्यवस्थापक आर.डी.दांड आदींची उपस्थिती होती.

About The Author