महात्मा फुले महाविद्यालयात गाडगेबाबांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात गाडगेबाबांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वच्छतेचे अग्रदूत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. सतीश ससाणे यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा स्वच्छतेचा मूलमंत्र सांगत असतांना शारीरिक स्वच्छते सोबतच मानसिक स्वच्छताही महत्त्वाची असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना म्हटले की, गाडगे महाराजांनी केवळ स्वच्छतेचाच मंत्र नाही दिला तर अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोलाचे कार्य केले आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ . बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ . पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी ‘कोवीड-19’ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

About The Author