मराठी कवितेचं दालन समृद्ध करणारी प्रतिभासंपन्न बालकवयित्री नेहा बब्रुवान मोरे
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे प्रशंसोद्गार
अहमदपूर (गोविंद काळे) : सामाजिक तसेच कोरोना या सध्याच्या परिस्थितीत जीवघेणा बनला असला तरी या कोरोनाला एक प्रकारे ‘चले जाव’ चा संदेश देणारी अहमदपूरची बालकवयित्री कु. नेहा बब्रुवान मोरे ही उद्याच्या मराठी कवितेचंं दालन समृद्ध करणारी कवयित्री आहे. असे तिच्या कवितेचे कोडकौतुक करून तिच्या भावी काव्यमय प्रवासासाठी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
कु नेहा मोरे ही बालकवयित्री येथील महात्मा फुले विद्यालयात नववी मध्ये अध्ययन करतेय. शाळेतील व वर्गातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात ती अग्रेसर असते. सूत्रसंचलन करणे, गीत गायन करणे, नृत्य, वक्तृत्व यासारख्या विविध कलागुण प्रकारात नेहा सहभागी होऊन आपल्या कलागुणांची छाप पाडते. हे सगळे कलागुण तिच्याजवळ उपजतच आहेत.
कु.नेहा ही महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथील इतिहास विभाग प्रमुख तसेच छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक,स्पर्धा परीक्षा केद्राचे प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांची कन्या आहे.तिने आपल्या एका हिंदी रचनेतून ‘कोरोना’ बद्दल काय म्हटले आहे? ते पाहा-
‘ अरे ओ कोरोना
तुम्हारा रूप क्या है
तुम्हारा रंग क्या है
मै तो तुम्हे बस तुम्हारे नाम से
जानती हु
मेरे सपनो मे आके मुझे डराते
हो
मै जानती हु तुम बहुत
डरावनी हो
अरे ओ कोरोना ‘
अशा प्रकारची ‘कोरोना’वर आधारीत आपली ही आशयगर्भ कविता आपल्या तरल प्रतिभेतून साकारणारी कु. नेहा मोरे ही कवयित्री उद्याच्या मराठी व हिंदी कवितेचं दालन समृद्ध करणारी आहे,अशा शब्दांत नेहाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी तिचं कोडकौतुक करून स्वागत केले.