किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी प्रा. बालाजी आचार्य यांची नियुक्ती

किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी प्रा. बालाजी आचार्य यांची नियुक्ती

संस्था सचिव प्रा. डॉ. बी आर बोडके यांच्या शुभहस्ते सत्कार

किनगाव (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा रा से यो चे कार्यक्रमाधिकारी प्रा.बालाजी वैजनाथ आचार्य यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली प्रा.आचार्य हे विद्यार्थी प्रिय असून शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन विद्यार्थी- विद्यार्थीनीच्या समस्या जाणून घेऊन मदतीला धाऊन जातात , महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी तत्पर असतात त्याचा कार्याची दखल घेऊन श्री छञपती शिक्षण संस्थेचे सचिव प्रा डॉ बी आर बोडके , प्राचार्य डॉ भारत भदाडे यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१पासून कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे त्यानुसार प्रा आचार्य यांनी कार्यभार स्विकारला यावेळी शिक्षण संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रा बी आर बोडके होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ भारत भदाडे , गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा प्रभाकर स्वामी ,प्रा बळीराम पवार , प्रा विष्णू पवार, प्रा डॉ दर्शना कानवटे, कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे आदि होते यावेळी प्रा डॉ बीआर बोडके यांच्या शुभहस्ते प्रा आचार्य यांचा शाल आणि पुष्पहारा ने सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस सम्यक शुभेच्छा देताना प्रा डॉ बोडके म्हणाले की, महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक वातावरण वृद्धीगत व्हावे, परिपूर्ण नियोजन,शिस्तबद्धता असावी आणि विद्यार्थी हेच आमचे दैवत, केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या गुणवत्तावाढी प्रशासकिय पदाचा भार सोपविण्यात येत असून सर्वच सहयोगी प्राध्यापकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ही केले यावेळी महाविद्यालयातील प्रा संजय जगताप, प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे, प्रा अनंत सोमवंशी, प्रा विठ्ठल चव्हाण ,प्रा पांडूरंग कांबळे, ग्रंथपाल प्रा सदाशीव वरवटे, ग्रंथालय परिचर इंद्रदेव पवार, प्रा अभय गोरटे, प्रा डी जी सुर्यवंशी, प्रा लक्ष्मण क्षिरसागर, प्रा डॉ अंबादास मुळे, प्रा राजु गुट्टे, प्रा ज्ञानेश्वर मुळे, प्रा पदमजा हगदळे, प्रा विक्रम गायकवाड, प्रा गुट्टे प्रा कबीर, प्रा निलेश कोटलवार, प्रा अजय शिंदे, प्रा नामदेव बच्चेवार ,प्रा चेतन मुंढे ,बळी कासलवार, उध्दवराव जाधव, ज्ञानेश्वर खिडसे , उमेश जाधव, अनिल भदाडे, किशन धरणे, शिवाजी हुबाड, आखिल शेख आदिनी शुभेच्छा दिल्या तर श्री छञपती शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव बोडके ,अध्यक्ष राम बोडके, सदस्या लताताई मोरे ,पुज्यभन्ते मुद्यीतानंदजी महाथेरो परभणी, संजयभाऊ कांबळे, प्रा एस एन कांबळे, प्रा डॉ नामदेव मुंढे ,प्रा डॉ संजय मुंडकर, प्रा डॉ मनोज सोमवंशी, प्रा आभिजीत बचुटे, प्रा संदिप मुंढे , सरपंच गंगाधर देपे ग्रामसेवक रविंद्र क्षिरसागर, राजेंद्र कांबळे, गोविदराव गिरी,चेअरमन मधुकर सुर्यवंशी आदिनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे सुञ संचालन प्रा प्रभाकर स्वामी यांनी केले तर शेवटी आभार प्रा बळीराम पवार यांनी मानले

About The Author